दिसा : राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींना विरोधकांचे कान टोचावे लागत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं. संसदेत सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र विरोधी पक्षातील नेते आपल्याला बोलू देत नाहीत. त्यामुळे जनसभेतून बोलण्याचा निर्णय घेतल्याचं मोदींनी म्हटलंय. 


100च्या नोटांची काही किंमत होती का? 8 नोव्हेंबरआधी 50 ची काय किंमत होती? छोट्यांना कोण विचारत होत?...गरीबांची ताकद वाढवण्यासाठी मी हा निर्णय घेतला, असे मोदी म्हणाले.


नोटबंदीच्या निर्णयानंतर देशवासियांकडे 50 दिवसांची मुदत मागितली. यामुळे नागरिकांना त्रास झाला खरा मात्र 50 दिवसांनंतर परिस्थिती नक्की बदलेल याचा पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलाय.