नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानं काळा पैश्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्यांना जोरदार दणका देण्याचा इशारा दिला आहे. मन की बातमध्ये मोदींनी याविषयीचं सुतोवाच केलं.


बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून ज्यांनी काळा पैसा दडवून ठेवलाय त्यांच्यावर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता पुढचा दणका बेनामी संपत्ती बळगणाऱ्यांना बसणार आहे.