नोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय
मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?
नवी दिल्ली : मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?
1. सर्च ऑपरेशन सुरु होणार -
नव्या वर्षात सरकार काळ्या पैशाच्या विरोधात सर्च ऑपरेशन आणखी जलद गतीने करणार आहे. इनकम टॅक्स विभागाने बँकांमध्ये जमा पैशांची माहिती जमा करणे सुरु केलं आहे. काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांचा शोध घेतला जातोय. नेते, ब्यूरोक्रेट्स, बिल्डर्स, बँकर्स, बिजनेसमन, शेयर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांवर करडी नजर असणार आहे.
2. बँक अकाउंटमध्ये येणार पगार -
छोटा-मोठा बिझनेसमॅन असो किंवा प्रायव्हेट कंपनीत काम करणार कर्मचारी असो आता त्यांना पगार रोख मिळणार नाही आहेत. बँक अकाऊंटमध्येच आता पगार जमा केला जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षात सगळ्या कंपन्यांना पगार हे बँक अकाउंटमध्ये टाकण्यास सांगितलं गेलंय आणि यासाठी राज्य सरकारची मदत देखील घेतली जाणार आहे.
3. मधल्या दलालांची भूमिका संपणार -
भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारी व्यवहारांमध्ये आता मधल्या लोकांना हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात लाच मागितली जाते. सरकार यासाठी ई-पोर्टल सुरु करणार आहे. याच्या माध्यमातूनच आता सरकारी व्यवहार होणार आहे.
4. बचत खात्यावर मिळणार कमी व्याज -
सरकार लवकरच बचत खात्यावरील मिळणाऱ्या व्याजाच्या दरात घट करण्याच्या विचारात आहे. लोकांनी पैसा बँकेत न ठेवता खर्च करावा हे व्याज दर कमी करण्यामागचं कारण आहे. अधिक बँका सेविंग अकाऊंटवर 4 टक्के व्याज देते. व्याजदर आता 2 टक्के होण्याची शक्यता आहे.