पंतप्रधान `मन की बात`मधून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज `मन की बात` या कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 28 वी तर नव्या वर्षातली दुसरी `मन की बात` आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 28 वी तर नव्या वर्षातली दुसरी 'मन की बात' आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यात त्यात आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाकडून या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यात आली होती.
निवडणूक आयोगानं या कार्यक्रमाला परवानगी दिल्यानं पंतप्रधान आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र देणार आहेत. 9 मार्च पासून सर्वत्र बोर्डाच्या परिक्षा सुरु होत आहेत.