नवी दिल्ली : गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात गर्भवतींसाठी खास योजना जाहीर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानुसार, गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी, रजिस्ट्रेशन, टीकाकरणासाठी 6000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली. हे पैसे डायरेक्ट या गर्भवती महिलांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतील. ही देशव्यापी योजना असेल. सध्या 53 जिल्हयांत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर चालवली जात आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.  


ज्येष्ठ नागरिकांसाठी...


सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं काही योजना जाहीर केल्यात. यानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर 10 वर्षांसाठी वार्षिक 8 टक्क्यांनी व्याजदर निश्चित केला जाणार आहे. व्याजाची ही रक्कम ज्येष्ठ नागरिक प्रत्येक महिन्यात घेऊ शकतील अशी तरतूदही त्यात करण्यात आलीय.