नवी दिल्ली : सामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात काही उल्लेखनीय घोषणा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी, गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना ध्यानात घेत बँकांना पुढाकार घेऊन नवीन योजना जाहीर करण्याचं  आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. शिवाय, देशातील सव्वाशे करोड नागरिकांसाठी सरकार काही नवीन योजना आणत आहे, त्या योजनांची घोषणाही मोदींनी यावेळी केली.


गरीब, निम्न मध्येम वर्ग आणि मध्यम वर्गासाठी लोकांना घर खरेदी करता यावं यासाठी काही मोठी निर्णय पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले... 


या योजनेनुसार, 


- पंतप्रधान गृह योजनेंतर्गत शहरांत या वर्गासाठी नवं घर घेण्यासाठी दोन नव्या योजना जाहीर


- 2017 मध्ये घर बनवण्यसाठी 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात 4 टक्क्यांची सूट जाहीर करण्यात आली 


- 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात 3 टक्क्यांची सूट 


- तर या योजनेंतर्गत 30 टक्के घरं जास्त बनविले जातील 


- घराची पुनर्बांधणी किंवा घरावर मजला बांधण्यासाठी कर्जात सूट दिली जाईल 


- यासाठी, २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजदरात 3 टक्के सूट