भोपाळ : भारतीय लष्कर बोलत नाही तर पराक्रम करून दाखवतं असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. मोदी झोपले आहेत, काही करत नाहीत असं तेव्हा सारखं बोललं जायचं, पण जसं लष्कर बोलतं नाही तसंच संरक्षण मंत्रीही बोलत नसल्याचं मोदी म्हणाले आहेत. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत मोदींनी ही अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही कधीच जमिनीच्या तुकड्यासाठी कोणाबरोबर वाद घातला नाही, हा भारताचा इतिहास आहे. येमेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानींना भारतीय लष्करानं वाचवलं, हीच आमची माणुसकी आहे, असा टोलाही पंतप्रधानांनी पाकिस्तानला लगावला आहे.  


काश्मीरमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा लष्करानं मदत कार्य केलं. ज्यांनी दगड मारेल त्यांना आपण वाचवत असल्याचा विचार लष्करानं केला नाही, असंही मोदी म्हणाले. भोपाळमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते शौर्य स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांसमोर भाषण केलं.