नवी दिल्ली : सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात बर्फाच्या खाली गाडलं जाऊन तब्बल नऊ दिवसांपर्यंत याच अवस्थेत राहूनही जिवंत राहिलेल्या जवानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लान्स नायक हनुमनथप्पा असं या जवानाचं नाव आहे. हनुमनथप्पा यांना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. इथं त्यांनी हनुमनथप्पा यांना 'अभूतपूर्व सैनिक' म्हणून संबोधलंय. 


लान्स नायक हनुमनथप्पा यांच्या अदम्य साहस आणि धैर्याला शब्दांमध्ये व्यक्त केलं जाऊ शकत नाही. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचारासाठी शर्थ करतेय. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण सर्वांनीच प्रार्थना करूया, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 


सेनेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लान्स नायक हनुमनतप्पा यांची परिस्थिती नाजूक असली तरी स्थीर आहे.