नवी दिल्ली : अतुल्य भारतचे सदिच्छा दूत पंतप्रधान नरेंद्र मोदीच रहातील... यापुढे यासाठी कोणत्याही अभिनेत्याला संधी देण्यात येणार नाही, असा निर्णय पर्यटन मंत्रालयानं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांनी आतापर्यंत केलेल्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती ‘अतुल्य भारत’च्या प्रचारातून दाखवल्या जाणार आहेत.


‘अतुल्य भारत’ अभियानातून अभिनेता आमिर खानची गच्छंती झाल्यानंतर त्याच्याजागी अमिताभ बच्चन यांच्याकडे या अभियानाची जबाबदारी सोपवणार अशी चर्चा होती. मात्र, आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेच कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याला या अभियानासासाठी संधी न देण्याचं ठरवलंय.


त्याऐवजी पंतप्रधानांची छबी आणि त्यांच्या विदेशातील भाषणांच्या ध्वनिचित्रफिती ‘अतुल्य भारत’ अभियानासाठी वापरण्याचा निर्णय मंत्रालयातर्फे घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या ध्वनिचित्रफितींची निवड सध्या सुरू असून नोव्हेंबर अखेरीस त्याचे प्रक्षेपण सुरू होईल, असे मंत्रालय सूत्रांतर्फे सांगण्यात आलंय.