हैदराबाद : उत्तरप्रदेशमध्ये आता पोस्टरची 'दंगली' सुरू झालीय. हैदराबाद पोलिसांनी 'दंगल'च्या पोस्टरवर एमआयएम अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांचे फोटो असलेले पोस्टर खाली उतरवलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानचा 'दंगल' या सिनेमानं अनेक रेकॉर्ड तोडलेत. याचाच फायदा घेत राजकीय पोस्टरबाजीसाठीही या सिनेमाच्या एडिटेड पोस्टर्सचा वापर केला जातोय. 


हैदराबादच्या अफजलगंज, मदिना या भागांत झळकावण्यात आलेल्या पोस्टरवर भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे फोटो दिसले.... या पोस्टरवर 'यूपी का दंगल' असं लिहिलेलं होतं... आणि या पोस्टरवर हिरो म्हणून असवुद्दीन ओवैसी आमिरच्या जागी दिसत होते. 


यूपीची ही पोस्टर दंगल काही वेळातच सोशल मीडियावर आणि व्हॉटसअप व्हायरल झाली... भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करत हे पोस्टर खाली उतरवले.