श्रीनगर : काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील सुरक्षा चौकीवर शुक्रवारी रात्री काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस शहीद झालाय तर आणखी एक पोलीस जखमी झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी चौकीवर गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. 


या गोळीबारात कॉन्स्टेबल नजीर अहमद शहीद झाले तर कॉन्स्टेबल जहूर अहमद जखमी झालेत. गोळीबारात एक नागरिकही जखमी झालाय. दरम्यान, सर्च ऑपरेशन सुरु आहे.