प्रशांत किशोर यांना शोधून काढा, ५ लाख बक्षिस मिळवा
प्रशांत किशोरांना शोधा, ५ लाख मिळवा, असे पोस्टर लखनौ काँग्रेसच्या ऑफिसबाहेर झळकत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे.
लखनौ : प्रशांत किशोरांना शोधा, ५ लाख मिळवा, असे पोस्टर लखनौ काँग्रेसच्या ऑफिसबाहेर झळकत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रशांत किशोर यांच्यावर पक्षाची व्यूहरचना ठरवण्याची जबाबदारी होती, म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. लखनऊमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर प्रशांत किशोर यांना शोधा, ५ लाखाचं बक्षीस मिळवा, असं बॅनर लावण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची प्रचाराची व्यूहरचना प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यावरुन पक्षामध्ये मतभेत सुरु आहेत. कारण उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसच्या युतीसाठी प्रशांत किशोर यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्यावरच पराभवाचं खापर फोडलं जात आहे.
प्रशांत किशोर यांनी ज्याप्रमाणे बिहारमध्ये नितीश कुमार यांना विजय मिळवून दिला, त्याच प्रमाणात ते उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देतील, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांना जबाबदार धरण्यात येत असून, त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.