प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने दिली आत्महत्येची धमकी
टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर संशयात आलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची प्रकृती बिघडल्याची त्याने तक्रार केली आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी त्याला मुंबईच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
मुंबई : टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर संशयात आलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची प्रकृती बिघडल्याची त्याने तक्रार केली आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी त्याला मुंबईच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार राहुलने स्वत:ला हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये बंद करुन घेतलं होतं. डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी समजवल्या नंतर तो काही वेळाने बाहेर आला. त्याने या दरम्यान हॉस्पिटलच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची देखील धमकी दिली होती. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार तो डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याची मानसिक स्थिती तपासली जात आहे.
प्रत्युषाचे वडिलांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला पत्र लिहून हॉस्पिटलच्या डायरेक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल हा पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं म्हटलं आहे आणि यामध्ये हॉस्पिटल प्रशासन देखील त्याची साथ देत असल्याचं आरोप त्यांनी केला आहे.