घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्याने घरगुती विनाअनुदानीत सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 12 व्या सिलिंडरनंतर घेणाऱ्याला आता 86 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.