मुंबई : एलईडी बल्बची किंमत जवळपास ९० टक्क्यांनी घटणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनर्जी एफिशियंट सर्व्हिसेस लिमिटेडकडून उपलब्ध करून दिले जाणारे एलईडी बल्ब आता सहज समान्यांच्या खिशाला परवडू शकणार आहे. 


गेल्या दोन वर्षांत या बल्बची किंमत ३१० रुपयांपर्यंत होती... ती आता सरळ सरळ अवघ्या ३८ रुपयांवर येऊन पोहचलीय. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला अवघ्या ३९ रुपयांमध्ये ९ वॉटचा एक बल्ब बनवण्याची बोली मिळालीय.


गेल्या आठवड्यात ५ करोड बल्ब बनवण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या बोलीत १४ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी मार्च महिन्यात कंपनीला ५५ रुपयांना बल्ब बनवण्याची बोली मिळाली होती. 


एखादा एलईडी बल्ब सामान्य बल्बच्या तुलनेत ८० टक्के कमी वीज वापरतो. सीएफएलच्या तुलनेतही ५० टक्के वीज या बल्बमुळे वाचवता येऊ शकते. 


केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, सध्या एलईडी बल्बच्या माध्यमातून दररोज ८५ लाख किलो वॉट वीज वाचवली जातेय.