नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची गवर्निंग काउंसिलची तिसरी बैठक सुरु आहे. या बैठकात नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया देशात जलद विकासासाठी एक रोडमॅप सादर करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीती आयोगाच्या या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले आहेत. पनगढिया यांच्या रोडमॅपमध्ये १५ वर्षाच्या विजन डॉक्युमेंटचे प्रमुख बिंदु असणार आहेत. या शिवाय ७ वर्षाच्या स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट आणि 3 वर्षाचा अॅक्शन प्लान देखील सादर होणार आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला अनुपस्थित होते. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया बैठकीत सहभागी झाले आहेत.


- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल याबाबत प्रेजेंटेशन करणार आहेत.


मोदींनी ट्विट केलं आहे की, "राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाच्या बैठकीत भारताचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. राज्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये रिफॉर्म्स केलं आहे. ही बैठक एक-दुसऱ्याला शिकण्याची संधी आहे. देशाचा विकास जलद गतीने कसा होईल यावर सादरीकरण होणार आहे"