नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशीरा तीन देशांच्या  दौऱ्यासाठी प्रस्थान करणार आहेत. या दौऱ्यातील त्यांचा पहिला थांबा बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे असणार आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की हा दौरा भारत - युरोप संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रसेल्समध्ये ते भारत - युरोपीय शिखर गटाच्या परिषदेत भाग घेतील. त्यानंतर ते बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्यासोबत द्विपक्षीय शिखर बैठकीत सहभागी होतील. 


३१ मार्चला चे चौथ्या आण्विक परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रसेल्सहून वॉशिंग्टनला रवाना होतील. १ एप्रिलला या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची आणि भारतातर्फे काही प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. 


त्यानंतर २ एप्रिलला ते वॉशिंग्टनहून ते दोन दिवसीय सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते राजधानी रियाध येथे असतील. सौदी अरबचे राजा शाह सलमान अब्दुल अझीज अल सउद यांनी मोदींना आमंत्रित केले आहे.