बंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकसोबत १०४ उपग्रह सोडले. हा एक जागतिक रेकॉर्ड इस्रोच्या वैज्ञानिकांनी करुन दाखवला. हे यश मिळवल्यानंतर पीएसएलवी-सी37 वर लावलेल्या हाय रिजोल्यूशन कॅमऱ्यातून श्रीहरिकोटा येथील इस्रो सेंटरवर एक व्हिडिओ पाठवला गेला आहे. यामुळे १०४ उपग्रह कशा प्रकारे कक्षेत स्थिरावले याचा व्हिडिओ यामुळे पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएसएलवी-सी37 रॉकेटने 320 टन वजनाचे 104 उपग्रहांना 4 वेगवेगळ्या स्तरावर अंतराळात सोडले. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केल्यानंतर 18व्या मिनटात भारताचे तीन सॅटेलाइट त्याच्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर एक-एक करुन 101 उपग्रह 10 मिनटात त्याच्या कक्षेत पोहोचले. पाहा व्हिडिओच्या माध्यामातून.


पाहा व्हिडिओ