नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीं आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साडे दहा वाजता ही बैठक होणार असून राहुल गांधींसोबत काँग्रेस खासदारांचं एक शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. देशातली शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या समस्यांविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याजवळ आहेत पण संसदेत मला बोलू दिलं जात नाही असा आरोप दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधींनी केला. त्यानंतर दोन्ही नेते प्रथमच आमने सामने येणार आहेत.