लखनऊ : उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचं राज्य... मात्र गेल्या 27 वर्षांपासून सर्वात जुना पक्ष या राज्यात सत्तेबाहेर आहे.. त्यामुळे काँग्रेसला नवं बळ देण्यासाठी आजपासून राहुल गांधी यांनी किसान यात्रा सुरू केलीय. मात्र यात्रेच्या सुरूवातीलाच माशी शिंकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाटा पळवण्यासाठी उडालेल्या हुल्लडबाजीचं चित्र पाहायला मिळाले ते राहुल गांधींच्या कार्यक्रमात... त्यांना बघण्यासाठी नव्हे, तर चक्क खाटा पळवण्यासांठी... गांधींचं भाषण ऐकण्य़ासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीच चक्क खाटा पळवून नेल्या.


'खाट पंचायती'चीच झाली पंचाईत!


आता राहुल गांधीच्या सभेत खुर्च्याएवजी सभेत खाटा कशाला? हा तुम्हाला प्रश्न प़डला असेल. त्याचं कारण आहे स्वतः राहुल गांधी....


काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी गांधींनी उत्तर प्रदेशातल्या देवरियापासून किसान यात्रेला सुरुवात केली. अभिनव कल्पना म्हणून यात्रेच्या सुरुवातीला 'खाट पंचायती'चं आयोजन करण्यात होतं. ही कल्पना राहुल यांचीच... पण खाटांना साखळ्या बांधून ठेवायला मात्र ते विसरले.


सभेतलं एक प्रातिनिधिक चित्र

राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं गरीब शेतक-यांना मारक असल्याचा घणाघाती आरोप गांधींनी या पळवा-पळवी पूर्वी केला. ही यात्रा दिल्लीपर्यंत जाणार आहे. वाटेत गांधी उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. 


'किसान मांग' नावाचं पत्र पंतप्रधानांना देण्यात येणारं आहे.. शेतकऱ्यांच्या समस्येवरांवर सरकारी उदासीनता अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी पळवापळवीमुळे किसान विकास यात्रेची खाट पडली, हे मात्र खरं...