नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रेल्वेतून प्रवास करताना खाण्याचे तुमच्याकडे अधिक पर्याय असतील. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही सुविधा काही ठरावि रेल्वे आणि स्टेशन्सवर सुरू केली जाईल. त्यानंतर इतर ठिकाणीही ही सुविधा सुरू होईल. 


ई-कॅटरिंग सुविधेनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार रेडी टू ईट पदार्थ मागवू शकाल. यबाद्दलचे सगळे निर्देश देण्यात आलेत. सोबतच, पॅन्ट्रीकार असणाऱ्या सगळ्या मेल, एक्सप्रेस प्रवाशांना रेडी टू ईट खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा पर्याय जोडण्यास सांगितलं गेलंय.  
 
यासाठी रेल्वेनं गितवाको फार्म्स, बीटीडब्ल्यू इंडिया, गिट्स फुड प्रोडक्टस आणि आर्यन फूड प्रोडक्टस या कंपन्यांशी संपर्क केलाय. यापूर्वी, चांगल्या जेवणासाठी केएफसी, डॉमिनोज, हल्दीराम, बिट्टू टिक्की वाला, फूड पांडा यांसारख्या कंपन्यांशी रेल्वेनं हातमिळवणी केलीय. 


या खाद्यपदार्थांबद्दल किंवा सुविधेबद्दल तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यासाठीही एक नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय. रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक १३८ वर तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता.