आता भारतात धावणार काचेची रेल्वे
भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंडसारखी काचेची रेल्वे भारतात धावणार आहे.
नवी दिल्ली : भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंडसारखी काचेची रेल्वे भारतात धावणार आहे. भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरसीटीसी आणि आरडीएसओ यांनी पेराम्बूर फॅक्ट्रीमध्ये या कोचचं डिझाईन तयार केलं आहे.
या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून ही ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. पहिल्यांदा काश्मीरमध्ये आणि त्यानंतर विशाखापट्टणममध्ये ही ट्रेन धावेल, असंही रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
हे कोच बनवण्यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 2015मध्येच हे कोच बनवायला सुरुवात झाली आहे. या महिन्यामध्येच या कोचचं काम पूर्ण व्हायची शक्यता आहे.