जयपूर : महिला आयोगाच्या सदस्याने बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला आहे.  या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांनी लेखी स्पष्टीकण मागितलं आहे. राजस्थान महिला आयोगातील एक सदस्य या बाबतीत अडचणीत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने चक्क बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढल्याने वाद निर्माण झाला आहे.


अल्वरच्या ३० वर्षीय महिलेवर तिचा पती आणि त्याच्या २ भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती, तेव्हा तिच्यासोबत आयोगाच्या सदस्यांनी सेल्फी काढला.


उत्तर जयपूरमधील महिला पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी काढला. 


या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉट्सअॅपवरून शेअर केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 


मी बलात्कार पीडितेसोबत चर्चा करत असताना सदस्य गुर्जर यांनी सेल्फी काढला. मला याबाबत कल्पनाच नव्हती. या प्रकारच्या कृत्यांचे मी समर्थन करत नाही, मी त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागितलं आहे. त्या माझ्याकडे लवरकच त्यांचे म्हणणे स्पष्ट करतील, असं राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी म्हटलं आहे.