नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांचे मंत्रीपदाचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी डोक्यावर निळा फेटा बांधून ते आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र शपथ घेताना आठवले गोंधळलेल्या स्थितीत होते. यादरम्यान ते शपथ घेताना स्वत:चे नाव उच्चारण्यासही विसरले. 


राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी त्यांना शपथ दिली. राष्ट्रपतींनी आठवलेंना शपथेची सुरुवात करुन दिली. मात्र त्यावेळी मी नंतर स्वत:चे नावच उच्चारण्यास ते विसरले. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यावेळी त्यांना नाव घेण्यास सांगितले. 


मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना बढती देण्यात आलीये. तर आठवलेंसह अनिल दवे आणि सुभाष भामरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.