नवी दिल्ली : आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणा यानंतर रामदेवबाबा यांनी जीन्सकडे मोर्चा वळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीकडून लवकरच पुरुष व स्त्रीयांसाठी जीन्स बाजारात आणण्यात येणार आहे. टेक्सटाईल क्षेत्रात प्रथमच पतंजली उतरणार आहे. यासह जीन्सबरोबर कार्यालयीन कामकाजात वापरण्यात येणारे कपडेही सादर करण्यात येणार आहेत. सध्या त्यांनी फक्त जीन्सच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केले आहे.


नागपूर येथे मिहान प्रकल्पात पतंजली फूड अँड हर्बल पार्क २३० एकरांत उभारण्यात येत आहे. त्यात १६०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून देश-विदेशांत उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे नागपूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यात केंद्र म्हणून विकसित होईल, असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.


पतंजलीकडून निर्मिती करण्यात येणारी जीन्स शेजारील देशांसोबत आफ्रिका आणि अमेरिकेतही विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.