राणी, करीना आणि माधुरीची झाली चोरी
मध्य प्रदेशच्या श्योपूरमधून राणी, करीना आणि माधुरीची चोरी झाली आहे. या तिघी तुम्हाला बॉलीवूडमधल्या अभिनेत्री वाटतील, पण चोरी झालेल्या या तिघी बकऱ्या आहेत. जरीन यांच्या घरातून या तिन्ही बकऱ्यांची चोरी झाली आहे.
श्योपूर : मध्य प्रदेशच्या श्योपूरमधून राणी, करीना आणि माधुरीची चोरी झाली आहे. या तिघी तुम्हाला बॉलीवूडमधल्या अभिनेत्री वाटतील, पण चोरी झालेल्या या तिघी बकऱ्या आहेत. जरीन यांच्या घरातून या तिन्ही बकऱ्यांची चोरी झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातल्या माधुरी या बकरीच्या पिल्लानं नुकताच एका पिल्लाला जन्म दिला होता. या पिल्लालाही चोरट्यांनी घेऊन गेल्याची प्रतिक्रिया जरीन यांनी दिली आहे.
जरीन यांच्या वस्तीमधले इतर जणांचे बकरेही चोरीला गेले आहेत. या परिसरातल्या 12 पेक्षा अधिक जणांच्या 80 पेक्षा जास्त बकऱ्यांची चोरी झाली आहे. दिवसाढवळ्या या बकऱ्या चोरीला जात आहेत. स्थानिकच या बकऱ्यांची चोरी करत असल्याचा आरोप होत आहे.