१० वीत प्रत्येक विषयात मिळवले १०० पैकी १०० गुण
अनेक राज्यांचे १० वी आणि १२ वीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे. पण तुम्ही कधी सगळ्याच विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवल्याचं ऐकलंय का ? पण एका विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेत हे शक्य करुण दाखवलंय.
मुंबई : अनेक राज्यांचे १० वी आणि १२ वीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे. पण तुम्ही कधी सगळ्याच विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवल्याचं ऐकलंय का ? पण एका विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेत हे शक्य करुण दाखवलंय.
कर्नाटक एजुकेशन बोर्डाच्या शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथील रंजनने 10वीच्या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. रंजन जेव्हा सोमवारी सकाळी झोपेतून उठला तेव्हा तो आयपीएल मॅचवर बोलत होता. तेव्हा त्याच्या शिक्षकाने त्याला त्याच्या निकालाची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने 625 पैकी 625 गुण मिळवले. कर्नाटक बोर्डात त्याने टॉप केला आहे.
रंजनचं म्हणणं आहे की, त्याने कोणतेही ट्युशन न लावता घरीच रोज ६ तास अभ्यास केला. तो रोज सकाळी अभ्यास करण्यासाठी लवकर उठायचा. त्याच्या या यशाबाबत त्याच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.