नवी दिल्ली : 'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना महाराष्ट्रातली नसून दिल्लीतली आहे. विशेष म्हणजे जेएनयूमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 'सैराट' दाखवण्याचा बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचं आरोप पीडित तरुणीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पीडित तरुणी जेएनयूमध्ये पीएचडीच्या पहिल्या वर्षाला आहे. विद्यापिठातील अनमोल नावाच्या मुलाने हा बलात्कार केला आहे.


 फेसबुकवर व्यक्त केली सैराट पाहण्याची इच्छा आणि....


पीडीत तरूणीने सैराट सिनेमा पाहण्याची इच्छा असल्याचं फेसबुकवर लिहिलं आणि अनमोलने आपल्याकडे सैराटची सीडी असल्याचं सांगितलं आणि सीडी देण्याच्या बहाण्यानं होस्टेलच्या रूमवरू त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला.