जव्हार : जादूटोण्यामध्ये कालिका मातेला बळी देईन अशी धमकी देत तरुणीवर एका भोंदुबाबाने बलात्करार केला आहे. मोखाडा तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. भोंदूबाबाला मदत करणाऱ्या १० जणांवर मोखाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे त्यात मोखाडा नगरपंचायतच्या नगराअध्यक्ष मंगला चौधरी यांचेही नाव समोर येत आहे. तरूणीने बाबावर आपले प्रेम आहे आणि स्वइच्छने विवाह केल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून दिलं आहे. त्यामुळे खरं काय आणि खोट काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.


मुख्य आरोपी मंगलमुनी दास बाबा याने गेल्या तीन महिन्यांपासून तिला खोडाळा, जव्हार, बलसाड अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून माझे शारीरिक शोषण केले अशी तक्रार या तरूणीने बुधवारी केली. मुख्य आरोपींबरोबर सोबत असलेले १० आरोपींनी मला ठार मारण्याची धमकी दिली. पळवून जबरदस्तीने लग्न सुद्धा लावून दिले. मुख्य आरोपीने भिलाड स्टेशन जवळच्या बंद खोलीत पुन्हा शारीरिक शोषण केले असे तरुणीने सांगितले आहे. पांडुरंग चौधरी, मंगला चौधरी, संदीप चौधरी, अल्का बुधर, किरण भांबरे, मलिक शेख, मंगल लाखत, मोरे, संजय बुधर, चेतन दळवी यांच्यावर अपहरण करून तिचे जबरदस्तीने लग्न लावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.