नवी दिल्ली : रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदींची वेगवेगळी भेट घेतली.टाटा संसच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी गुरुवारी आणि रतन टाटा यांनी  शुक्रवार पंतप्रधानांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांनी सायरस मिस्त्रींना हटवल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. टाटा ग्रुपमध्ये अचानक झालेल्या या बदलानंतर व्यापार आणि राजकीय जगतात हालचाली वाढल्या.पदावरुन हटवल्याने मिस्त्री यांनी टाटा समुहावर आरोप केले आहेत की त्यांना चुकीचे निर्णय आणि संशयास्पद देवाणघेवाणीमुळे टाटा समुहाला मोठं नुकसान झालं आहे. त्यांनी रतन टाटा यांच्यावर देखील आरोप केले आहेत. रतन टाटा यांनी हा निर्णय घेतल्यानतंर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती.


टाटा संसने सध्या ५ सदस्यीय समितीचं गठन केलं आहे. ते आता नव्या चेअरमनचा शोध घेणार आहेत. त्यासाठी त्यांना ४ महिन्यांना कालावधी देण्यात आला आहे. सध्या टाटा समुहाची जबाबदारी रतन टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.