नवी दिल्ली: कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या प्रचाराला चालना देण्यासाठी सरकार माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 'डिजीशाला' नावाचा टी.व्ही चॅनल लॉन्च केला आहे. डिजिशाला फ्री टू एयर चॅनल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या डिजिशाला चॅनलची सुरूवात लोकांना डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्थेप्रति जागृकता निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. डीडी फ्री आणि डीटीएचवर चॅनेल दिसणार आहे. चॅनलने संभाव्य प्रेक्षक म्हणून दोन कोटी परिवार टार्गेटचा अनुमान ठेवला आहे.


डिजिटल शासन एकाप्रकारे प्रगतीशील शासन असणार आहे. चॅनलच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागांतील लोकांना डिजिटल व्यवहारांचे फायदे समजण्यास मदत मिळेल आणि लोक कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहीत होतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.