जेएनयूमधला तो व्हिडिओ खरा
जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि त्याच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
नवी दिल्ली : जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा आणि त्याच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. देशविरोधी घोषणांच्या या व्हिडिओशी छेडछाड केली असल्याचा आरोप होत होता. याबाबत आता सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनं(सीएफएसएल) अहवाल सादर केला आहे.
जेएनयूमधला हा व्हिडिओ खरा असून या व्हिडिओबरोबर कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. द हिंदू या वृत्तपत्रानं दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांचा हवाला देत ही बातमी दिली आहे.
जेएनयूमधल्या या घोषणाबाजी प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि उमर खालिद यांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोघंही आता जामिनावर सुटले आहेत.