नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना महिन्याला किती वेतन मिळते तुम्हाला माहीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्जित पटेल यांचा पगार दोन लाखाहून थोडा अधिक आहे. माहिती अधिकाऱाच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीये. पटेल यांना सप्टेंबरमध्ये २ लाख ९ हजार रुपये इतका पगार देण्यात आला होता. ऑगस्टमध्ये रघुराम राजन यांनाही इतकाच पगार देण्यात आला होता. 


उर्जित पटेल यांना 2.09 लाख वेतनासोबतच दोन गाड्या आणि त्या गाड्या चालवण्यासाठी चालक मदतीला आहेत. मात्र त्यांच्या घरात एकही मदतनीस नसल्याचे आरबीआयने म्हटलेय. 


रघुराम राजन यांनी 5 सप्टेंबर 2013मध्ये गर्व्हनरपदाचा कारभार हाती घेतला. तेव्हा त्यांचा पगार 1.69 लाख रुपये इतका होता. जानेवारीमध्ये हे वेतन वाढवून 2.09 लाख इतके कऱण्यात आले.