नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. आरबीआय प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं उर्जित पटेल म्हणाले आहेत.
प्रिटिंग प्रेसही अहोरात्र नव्या नोटा छापण्याचं काम करत आहेत तसंच ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. आरबीआयकडे नोटांच्या मोठ्याप्रमाणावर साठा असल्याची प्रतिक्रियाही पटेल यांनी दिली आहे.