लवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव
नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, 500 आणि 1000च्या जुन्या नोटांवर बंदी असली तरी एअर तिकीटे तसेच रेल्वे तिकीटांसाठी जुन्या नोटा टालणार आहेत. बँकिंग नेटवर्क मजबूत कऱण्याच्या दिशेने आहोत. लोकांच्या सुविधांकडे आमचे लक्ष आहे. ग्रामीण भागात अधिकाधिक कॅश लवकरच कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष आहे.
काल देशभरात तब्बल 18 कोटी रुपयांचे ट्राँझॅक्शन झाले. एटीएममध्ये बदल करण्यात येत आहेत. देशभरात मायक्रेो एटीएम लावण्यात येणार आहेत. तसेच पैसे काढण्याची एटीएमची मर्यादा 2500पर्यंत तर बँकेतून नोटा बदलण्याची मर्यादा 4500 पर्यंत करण्यात आलीये.
यादरम्यान मात्र अत्यावश्यक सेवांसाठी जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. सरकारी रुग्णालये, पेट्रोल पंप यासारख्या ठिकाणी जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. 2 लाख कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी काम करत आहेत. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळ्या रांगांची सोय करण्यात आलीये. लोकांसाठी सरकारने हा निर्णय घेतला. लोकांनी या निर्णयाने त्रस्त होण्याची गरज नाहीये, असे दास यावेळी म्हणाले.