नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपार झालीये. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही जेव्हा जिओ लाँच केले होते तेव्हा लवकरात लवकर १० कोटी ग्राहक जमवण्याचे आमचे लक्ष्य होते. मात्र इतक्या कमी महिन्यात आम्ही हे लक्ष्य गाठू याचा मात्र विचार केला नव्हता, असे अंबानी यावेळी म्हणाले. 


कंपनीने ५ सप्टेंबर २०१६मध्ये जिओ ४जी सर्व्हिस लाँच केली होती. त्यानंतर अल्पावधीतच जिओ ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. ग्राहकांच्या संख्येनुसार जिओ देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी बनलीये.