नवी दिल्ली : देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षाला दोन कोटींपेक्षा कमी व्यवहार करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी जर डीजीटल व्यवहारांची कास धरली, तर त्याचं अंदाजित उत्पन्न 16 लाखांवरून आता 12 लाख रुपये धरण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या करामध्ये मोठी कपात होणार आहे. 


सिलिंडरचे अनुदान लाटणाऱ्यांना चाप 


दरम्यान,आता आणखी एका निर्णयाची भर पडणार आहे. आगामी काळात आयकर विभाग स्वत:कडे असलेली करदात्यांच्या उत्पन्नाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम खात्याला देणार आहे. या माहितीच्या आधारे पेट्रोलियम खात्याकडून उच्च उत्पन्न गटात असूनही घरगुती सिलिंडरचे अनुदान लाटणाऱ्यांना चाप लावण्यात येणार आहे.


१० लाख तसेच यावर उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे सिलिंडर अनुदान मिळणार नाही. आयकर विभागाकडून अशा व्यक्तींच्या नावाबरोबरच त्यांनी भरलेली कराची रक्कम , पॅन कार्ड क्रमांक , मोबाईल क्रमांक, ईमेल व जन्मतारीखेची माहितीही पेट्रोलियम विभागाला देण्यात येणार आहे.