हवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
नवी दिल्ली : देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
काही ठिकाणी बँकांमध्ये नोट कमी पडत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून सरकारकडून उपाययोजना केली जात आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नोटा पोहोचवण्यासाठी सरकारने आता हवाई दलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई दलाकडून ग्लोब मास्टर विमानाचा उपयोग होत आहे.