रिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस
रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
ऑलिंपिकमध्ये या दोघींनाच आतापर्यंत पदक मिळविण्यात यश मिळाले. पी. व्ही. सिंधूला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले. तर, साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले.
साक्षी मलिकचे वडील दिल्ली परिवहन मंडळात नोकरीस असून, त्यांनाही बढती देण्यात येणार असल्याचे, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दोघींचे अभिनंदन केले आहे. या दोघींच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे.