नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीता बहुगुणा जोशींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनिती ठरवणारे प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशातील ब्राम्हण मतदारांच्या संख्येवर डोळा ठेवून शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी दिली. पण ब्राम्हण असलेल्याच रीता बहुगुणा जोशी भाजपमध्ये गेल्या तर काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  


शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार करणं आणि राज बब्बर यांना उत्तर प्रदेशचं पक्षाध्यक्ष केलं गेल्यामुळे रीता बहुगुणा नाराज झाल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी किसान यात्रा, संदेश यात्रा, खाट सभा घेत असताना रीता बहुगुणा कुठेच दिसल्या नाहीत. तेव्हापासूनच या चर्चांना सुरुवात झाली होती.


रीता बहुगुणा यांचा भाऊ आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा जोशींनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रीता बहुगुणा या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवंती नंदन बहुगुणांची मुलगी आहे.