नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या बचावासाठी धावला आहे. 


पोस्टरवर रॉबर्ट वाड्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी आरोप होत असल्यानं काँग्रेसनं जंतरमंतरवर लोकशाही बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 


पण या रॅलीमध्ये अनेकांचं लक्ष केंद्रीत केलं ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणलेल्या पोस्टरनं. या पोस्टरमध्ये सोनिया, राहुल यांच्याबरोबरच सोनियांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचाही फोटो होता. त्यामुळे काँग्रेसचं हे आंदोलन लोकशाही बचाव आहे का गांधी परिवार बचाव असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. 


वाड्रांवर जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप


सोनियांचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर राजस्थान आणि हरियाणामध्ये जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसनं मात्र वारंवार हे आरोप फेटाळून लावले आहेत.