मराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर
मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
भाजप आणि आरएसएसचे लोक प्रतिमोर्चा काढण्यात आग्रही आहेत, मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून
आंबेडकरी जनतेने मोर्चे काढू नये, असं आवाहन देखील यावेळी प्रकाश आंबडेकर यांनी केलं आहे.
मराठा समाजाचे मोर्चे स्पॉन्सर्ड नाहीत, ते स्वयंस्फुर्तीने मोर्चे काढत आहेत, मोर्चे काढण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
अमर साबळे यांनीच प्रतिमोर्चे काढण्याची भाषा केली आहे. अमर साबळे तेल ओतण्याचे काम करत आहेत.
तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर, भाजप आणि आरएसएस जबाबदार असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे,