नागौर : राजस्थानमधल्या नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर बोलताना सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी शनिशिंगणापूर आणि जेएनयूच्या वादावर संघाची भूमिका स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दल मंदिर व्यवस्थापनाच्या मनात काही चुकीची मतं असतील ती चर्चेनं बदलायला हवीत असं भैयाजी जोशींनी म्हटलंय. 


जेएनयूमधल्या देशविरोधी घोषणांचा संघ निषेध करत असल्याचं ते म्हणाले. असे कार्यक्रम एखाद्या विद्यापीठात होणं हे अत्यंत चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं.