बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम.कृष्णा भाजपच्या वाटेवर आहेत. एस.एम.कृष्णा शंभर टक्के भाजपमध्ये येणार असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी दिली आहे.


काही दिवसांपूर्वी कृष्णा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसला नेत्याची नाही तर व्यवस्थापकाची गरज असल्याचं म्हटलं होतं. आता कृष्णा यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तानं कर्नाटक काँग्रेसला मोठा हादरा बसणार आहे. एस.एम.कृष्णा हे यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री होते, तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. याआधी ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते.