उत्तरप्रदेश : विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची आपल्या वक्तव्यांवरून सतत चर्चेत असतात... आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त धार्मिक विधानावरून चर्चेत आल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरादाबादमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत श्रोत्यांना संबोधित करताना त्यांनी 'तीन तलाक' संबंधात वादग्रस्त विधान केलंय. 


ज्या महिला 'तीन तलाक'नं चिंताग्रस्त आहेत, पीडित आहेत.. त्यांनी असा धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश करावा... माझ्या धर्मातील मुलं तयार आहेत... त्यांना 'आय लव्ह यू' म्हटलं तर ते लग्नासाठी तयार होतील. 


'उत्तरप्रदेशात आता योगींचं सरकार आलंय... त्यामुळे आता चिंतेचं काहीही कारण नाही. मी मौलानांनाही सांगू इच्छिते... उत्तरप्रदेशात शांततेत राहायची इच्छा असेल तर अयोध्यामध्ये राम मंदिरच बनेल, इतर काहीही नाही असा फतवा त्यांनी जाहीर करावा...' अशी चिथावणीखोर भाषा वापरत साध्वी प्राची यांनी आपल्या भाषणात वापरलीय. 


उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाल्यानंतर साध्वींनी याला 'हिंदू विजय' म्हटलं होतं.