नई दिल्ली : द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंकराचार्यांनी दुष्काळासाठी साईपूजेला कारणीभूत ठरवलं आहे. ते म्हणतात की जेव्हा ही चुकीच्या लोकांनी पूजा होते तेव्हा दुष्काळ किंवा गंभीर स्थिती निर्माण होते.


शनीशिंगणापूर मंदिरात महिला प्रवेशाबाबतीत ही शंकराचार्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, ' शनीशिंगणापूर मध्ये महिलांचा प्रवेश दुर्भाग्यपूर्ण आहे. आता यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतील. शनी हा एक क्रुर ग्रह आहे. यामुळे महिलावरील गुन्हे वाढतील.'