मुंबई : सॅमसंगने गॅलेक्सी C या सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 मार्केटमध्ये लाँच केलाय.  या फोनचे दोन फायदे असतील. या फोनमध्ये 32GB आणि 64GB असे दोन इंटरनल मेमरीचे प्रकार असतील.  या गॅलेक्सी C5ची किंमत क्रमश: २२,४९१ आणि २४,५४५ अशी असणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत या गॅलेक्सी C5 चे फिचर्स

१. या स्मार्टफोनची संपूर्ण मेटलबॉडी आहे.
२. ५.२ इंचाचा एचडी डिस्प्ले
३. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 17 ऑक्टाकोर चिपसेट, 4GB रॅम आहे.
४. फोटोग्राफीसाठी एलइडी फ्लॅशबरोबरच १६ मेगापिक्सल तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे सेल्फी लव्हर्सना हा फोन लगेचच आकर्षित करणारा आहे.
५. हा फोन डुअल हायब्रिड सिम सपोर्ट असेल ज्यामुळे एका सिम स्लॅाटमध्ये सिम तर दुसऱ्या स्लॅाटमध्ये मेमरी कार्ड टाकू शकतो.
६. कनेक्टीव्हीटी साठी 4G LTE सहित वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी आणि जीपीएस आहेत.
७. ह्याची बॅटरी २.६००mAh ची आहे.
८. कंपनीचा दावा आहे की हा फोन 4G नेटवर्कवर २३७ तासांचा स्टँडबाय वॅकअप देऊ शकते.

या फोनचे बुकिंग चीनमध्ये सुरू झाले मात्र ग्लोबल लाँच कधी होईल हे अजून सांगण्यात आले नाही.