गुवाहाटी : आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली. 
 
एकूण १२६ जागांच्या आसाम विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षाचे तब्बल ८६ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अभूतपूर्व बहुमतानं निवडून आलेल्या सरकारच्या शपथविधीला भाजपचे देशातले सगळे बडे नेते आवर्जून उपस्थित होते.


भाजपचे बडे नेते हजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत कुमार, सुरेश प्रभू यांची मंचांवर उपस्थिती दिसली. त्याचप्रमाणे भाजप आणि एनडीए शासित राज्याचे सगळे मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे लक्ष्मीकांत पारसेकर, हरियाणाचे मनोहरलाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हजर होते.


मावळते मुख्यमंत्रीही मंचावर


शिवाय मावळते मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. सर्बानंद यांनी स्वत: गोगोईंना शपथविधीचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी, गोगोईंनाही मंचावर आवर्जून स्थान देण्यात आलं.