चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी शशिकला यांना चार वर्ष तुरुंगवास आणि 100 कोटींच्या दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. त्यामुळे शशिकलांना तुरूंगात धाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकला राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये तामिळनाडूचे पोलीस महानिरीक्षक पोहचलेत. थोड्याच वेळात शशिकला शरण येतील अशी चर्चा आहे. चेन्नई जवळच्या गोल्डन बे रिसोर्टमध्ये 129 आमदारांसह गेल्या सहा दिवसांपासून त्या वास्तव्याला आहेत.  आता सकाळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी चार बसेस आणि मोठा पोलीस फौजफाटा रिसॉर्ट बाहेर तैनात करण्यात आला आहे.


कर्नाटकातल्या विशेष न्यायालयानं जयललिता आणि शशिकला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयानं  न्यायालयाचा निकाल बदलून दोघींना निर्दोष सोडलं होतं. पण कर्नाटक सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


त्यावर आज सकाळी सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिलाय. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात पनीरसेल्वम मुख्यमंत्री होण्यातला मार्ग अवघड झाला. त्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला विधीमंडळ नेतेपदी निवडण केली.