मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र घोषणा देणं पडणार महागात
कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांवर दडपशाहीचा कळस गाठलाय. बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्रची घोषणा देणं महागात पडणार आहे.
बेळगाव : कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांवर दडपशाहीचा कळस गाठलाय. बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्रची घोषणा देणं महागात पडणार आहे.
लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात जय महाराष्ट्रची घोषणा दिल्यात थेट पद आणि सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातला कायदा करण्याचा घाट कर्नाटक सरकारनं घातलाय.
आगामी अधिवेशनातच हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिलीय. त्यामुळं मराठी भाषिक पट्ट्यात संतापाची लाट पसरलीय.
त्यामुळं मराठी भाषिक पट्ट्यात संतापाची लाट पसरलीय. असल्या तालिबानी वृत्तीचा शिवसेनेनं तीव्र शब्दात निषेध केलाय. तसंच राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांनी यात लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी केलीय.